spot_img
spot_img

आधी घशाची तहान… मग बाकीचे पाणी! बुलढाण्यात पाणीउपशाला लगाम; नियम मोडल्यास पंप-मशीन जप्त! पिण्याच्या सार्वजनिक स्रोतांच्या ५०० मीटर परिसरात नव्या विहिरी-बोअरवेलवर बंदी; जलसाठे पिण्यासाठी राखीव!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पाऊस कमी, भूजलपातळी खालावली आणि आता पिण्याच्या पाण्याचे संकट दारात! संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी ३ नोव्हेंबर रोजी कठोर आदेश जारी केले आहेत. उपलब्ध पाणी आधी नागरिकांच्या पिण्यासाठी राखण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपासून ५०० मीटर परिसरात खासगी अथवा व्यावसायिक वापरासाठी नवीन विहिरी आणि बोअरवेल खोदण्यास बंदी घालण्यात आली आहे. या परिसरातील जुन्या बोअरवेलमधून पाणीउपशासाठीही जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी अनिवार्य राहणार आहे.

शासकीय जलप्रकल्प, नद्या, नाले, बंधारे आणि सार्वजनिक स्रोतांतील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश आहेत. सिंचन, उद्योग आणि इतर कारणांसाठी होणारा पाणीउपसा बंद करण्याचे आदेश असून, टँकर व सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांना प्राधान्य मिळणार आहे.

आदेश धुडकावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. पाणीउपशाचे पंप, पाइपलाइन आणि बोअरवेल मशीन जप्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र पथके अनधिकृत पाणीउपशावर गस्त घालणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांना गळती रोखणे, पाणीवापरात किमान १० टक्के कपात करणे आणि ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना आहेत. अंमलबजावणीची जबाबदारी महसूल, पंचायत व नगरपालिका प्रशासनावर सोपवण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!