spot_img
spot_img

BIG NEWS! पाणी सोडा… अन्यथा आम्हीच सोडू! पेनटाकळीवर उद्या शिवसेनेची धडक; आमदार सिद्धार्थ खरात यांचा प्रशासनाला थेट इशारा! तोडलेल्या वीजजोडण्याही पूर्ववत करा; ३ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता धरणावर मोर्चा!

मेहकर (हॅलो बुलढाणा) पेनटाकळी धरणाच्या पाण्यासाठी आता आंदोलनाची ठिणगी पडली आहे! धरणाखालील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडा आणि तोडलेल्या कृषी वीजजोडण्या तातडीने पूर्ववत करा, या मागण्यांसाठी आमदार सिद्धार्थ खरात यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. उद्या, मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा पेनटाकळी धरणावर धडकणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

“प्रशासनाने स्वतः उपस्थित राहून पाणी सोडावे. अन्यथा शिवसेना आणि शेतकरी स्वतः पाणी सोडतील,” असा इशारा खरात यांनी आपल्या आवाहनातून दिला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावर उद्या धरणस्थळी काय घडणार, याकडे लक्ष लागले आहे.

धरणाच्या खालील भागातील सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर वरच्या गावांतील शेतकऱ्यांच्या तोडण्यात आलेल्या वीजजोडण्या पुन्हा जोडण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात, अशीही मागणी त्यांनी केली.या दोन्ही मागण्यांवर प्रशासनाने प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी भूमिका खरात यांनी मांडली आहे. पाणी सोडण्यासह वीजपुरवठ्याचाही प्रश्न त्यांनी या मोर्चाच्या निमित्ताने उपस्थित केला आहे.

पेनटाकळी धरणाच्या पाण्याशी संबंधित सर्व शेतकरी बांधवांनी उद्या सकाळी अकरा वाजता मोठ्या संख्येने धरणावर उपस्थित राहावे, असे आवाहन खरात यांनी केले आहे.प्रशासन पाणी सोडणार की आंदोलन तीव्र होणार? उद्याच्या मोर्चाकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!