spot_img
spot_img

वय १०२ वर्षे… तरीही आजींचा उत्साह तरुणांना लाजवणारा! म्हाडा कॉलनीत लिलाबाई आजींनीच केला आरोग्यसेवेचा श्रीगणेशा; नवदुर्गा मंडळाचा अनोखा जागर!देवीच्या भक्तीतून माणुसकीची शक्ती! कर्करोगासह विविध आजारांची तपासणी, मोफत औषधोपचार अन् महिलांच्या आरोग्यासाठी विशेष पुढाकार!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नवरात्रोत्सव म्हणजे केवळ देवीचा जागर नव्हे, तर समाजसेवेचाही ध्यास! याचाच आदर्श घालून देत म्हाडा कॉलनीतील श्री म्हाडेश्वर नवदुर्गा उत्सव मंडळाने ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव  तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानांतर्गत भव्य आरोग्य शिबिर आयोजित केले.

या शिबिरात लक्ष वेधले ते तब्बल १०२ वर्षांच्या लिलाबाई पुराणकर आजींनी! आजींच्याच हस्ते उद्घाटन झाले. स्वतः आरोग्य तपासणी करून घेत त्यांनी उपस्थितांना आरोग्य जागरूकतेचा प्रेरणादायी संदेश दिला.

शिबिरात महिलांची कर्करोग तपासणी, रक्तदाब, सिकलसेल आणि असंसर्गजन्य आजारांची तपासणी करण्यात आली. मासिक पाळीविषयक आरोग्य, स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध आणि निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यात आली.डॉ. सुनीता बडगे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ऋषिकेश जाधव, डॉ. जागृती गुप्ता, डॉ. श्रेया भोयार व वैद्यकीय पथकाने मोफत तपासणी, औषधोपचार केले.

यावेळी राजू धुताडमल, अनंत वायझडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष संदीप वानखेडे व सहकाऱ्यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!