spot_img
spot_img

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आझाद हिंदचे अनोखे चिखल आंदोलन! विना अट हेक्‍टरी एक लाख मदत जाहीर करावे अन्यथा समाधी आंदोलनाचा इशारा! छत्रपती शिवरायांचा आदर्श घेत मुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बुलढाण्यात अनोखे चिखल आंदोलन आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या पात्रात आज करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना विना अट हेक्टरी एक लाख मदत करावी अन्यथा यापुढे समाधी आंदोलन करण्याचा गर्भित इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

सद्यस्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी कोरडा दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात आणि मरणासन्न अवस्थेत आला आहे. कोरडा दुष्काळ नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दसरा दिवाळी अंधकारमय असून शेतकऱ्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहे.
अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कोणतेही नियम अटी न लादता सरसकट हेक्‍टरी एक लाख रुपये मदत जाहीर करावी. दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सदर मदत पोहोचवावी.
छत्रपती शिवरायांचा विचारावर कार्य करणाऱ्या महाराष्ट्र सरकारने छत्रपतींचाच आदर्श घेत विना हेक्‍टरी एक लाख रुपये मदत जाहीर करावी.
करीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिखल आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर आवाहन आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातून करण्यात आले आहे.
तर सदर आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढे समाधी घेण्याचा इशारा सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड सतीशचंद्र रोठे पाटील आणि बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष रामभाऊ व्यवहारे यांनी दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!