चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) नगरीत आज उत्साहाचा महासागर उसळणार आहे! भारतीय जनता युवा मोर्चा, चिखली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बहुप्रतीक्षित ‘श्वेताताई पर्व 2.0’ या भव्य दहीहंडी सोहळ्याला आता अवघ्या काही वेळात सुरुवात होणार आहे. विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून चर्चेत असलेल्या या सोहळ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दहीहंडी फोडण्यासाठी दमदार गोविंदा पथके सज्ज झाली असून, थरांवर थर रचत आकाशाला गवसणी घालण्याचा चित्तथरारक संघर्ष पाहायला मिळणार आहे. ढोल-ताशांचा कडकडाट, डीजेचा दणदणाट, गोविंदांचा जोश आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीमुळे चिखलीतील वातावरण उत्साहाने भारावून गेले आहे.
नेमकी कोणती गोविंदा टीम बाजी मारणार? कोणाचे थर सर्वाधिक उंच जाणार आणि विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी कोण फोडणार? या प्रश्नांची उत्तरे आता थोड्याच वेळात मिळणार आहेत.
या भव्य सोहळ्याचा प्रत्येक थरारक क्षण टीम ‘हॅलो बुलढाणा’ चिखलीतून थेट प्रक्षेपित करत आहे. घरबसल्या या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी ‘हॅलो बुलढाणा’च्या LIVE प्रसारणाशी जोडलेले राहा!
यावर होणार LIVE! लगेच SUBSCRIBE करा
https://youtube.com/@citynewsbuldana?si=dxgb2J3DHkUS79Nj












Total Users : 3397244