बिबी (हॅलो बुलढाणा/भागवत आटोळे) लोणार तालुक्यातील बिबी येथील रहिवासी गजानन आत्माराम साळवे हे २५ ऑगस्ट २०२६ पासून बेपत्ता असून, अद्याप त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईकांसह परिसरातील गावांमध्ये त्यांचा कसून शोध घेतला; मात्र अनेक दिवस उलटूनही त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे साळवे कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
गजानन साळवे नेमके कुठे गेले? त्यांच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. त्यांच्या अचानक बेपत्ता होण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी बिबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, त्यांचा शोध घेण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.
गजानन साळवे यांना कुणी पाहिले असल्यास, त्यांच्या वास्तव्याबाबत माहिती असल्यास अथवा ते कोणत्याही परिसरात आढळून आल्यास संबंधितांनी माहिती लपवून न ठेवता तातडीने कुटुंबीयांशी संपर्क साधावा. नागरिकांच्या एका फोनमुळे चिंताग्रस्त कुटुंबाला मोठा दिलासा मिळू शकतो.
माहितीसाठी संपर्क : ९५११९७४७३५ / ९१५६३००९५२













Total Users : 3394952