बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सध्या बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत, ही गंभीर अवस्था लक्षात घेऊन शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्य शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संथापक रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे,युवा प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण मोरे, मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले यांच्यासह राज्यस्तरीय शिष्टमंडळाने आज दि. 2 सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे राज्यात निर्माण झालेली विदारक परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देत तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यासह इतर मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले. यावेळी चर्चा करताना रविकांत तुपकर यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा करीत शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्य शिष्टमंडळाच्या वतीने यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यासह पावसाअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झालेल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा, महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी भरीव आर्थिक मदत द्यावी, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची पीक कर्जे व शेतीशी संबंधित कर्जांना तातडीने स्थगिती देऊन कर्जमाफीबाबत ठोस निर्णय घ्यावा,शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत देऊन शेतीपंपांना नियमित वीजपुरवठा करावा, पिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने सिंचनाचे नियोजन, जलसाठ्यांचा वापर व आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा,दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने मंजूर करून वितरित करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी ‘क्रांतिकारी‘ चे नेते अमोल मोरे, अॅड. प्रवीण सुरडकर, सुनिल मिसाळ, बाळू पाटील, नितीन सोनटक्के, निलेश राजपूत, रामेश्वर अंभोरे, श्रीराम चलवाड, विठ्ठल खेडेकर, हरिभाऊ उबरहांडे, भागवत धोरण, अरबाज खान, पवन काकडे, हर्षल गवते, यांच्यासह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













Total Users : 3383428