बुलढाणा (हॅलो बुलढाणा) निवडणूक नसतांनाही, जिल्ह्यातील चिखली आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघात राजकारण तापू लागले आहे. आम. संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी आ. श्वेता महाले यांच्या भाजपाच्या गडात पुढील आमदारकी लढण्यासाठी वाढदिवसाच्या
निमित्ताने कार्यक्रम घेऊन जंगी शक्तीप्रदर्शन केले. ‘याचे प्रत्युत्तर म्हणून की काय?’ आ.श्वेता महालेंचे पती व लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांनी देखील आपला वाढदिवस बुलढाण्यात साजरा करण्याचे ठरवले असून, ‘भावी आमदार म्हणून त्यांचे कटआउट,बॅनर व सोशल मीडियावरच्या पोस्ट लक्ष वेधत असल्याने,’हम भी किसीसे कम नही!’ असा अघोषित संदेश दिला गेला आहे. विद्याधर महाले यांचे जिल्ह्यासाठी असलेले योगदान लक्षात घेता ‘पुढचे आमदार विद्याधर महालेच!’, अशी चर्चा सुद्धा सुरू झाली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपले सुपुत्र नगरपालिकेचे गटनेता कुणाल गायकवाड यांना चिखली मतदारसंघातून आमदार बनविण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.त्यासाठी चिखलीत कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यावर जोर दिला जात आहे. आतापर्यंत अनेक पक्ष प्रवेश सोहळे चिखलीत संपन्न झाले.या सोहळ्यात आमदार गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देत विरोधकावर नावानं घेता हल्लाबोल चढवला होता. काही दिवस पूर्वी कुणाल गायकवाड यांचा वाढदिवस चिखलीत साजरा करून वारेमाप खर्च करीत, प्रचंड शक्ती प्रदर्शन करण्यात आले. हाच कित्ता आता श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले बुलढाण्यात गिरवत आहेत.त्यांचा 49 वा वाढदिवस बुलढाण्यातील सहकार विद्या मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. कुणाल गायकवाड यांच्या वाढदिवसापेक्षा महाले यांचा वाढदिवस कसा सरस ठरेल,याबाबत नियोजन करण्यात आले आहे.धाड नाक्यापासून तर सहकार विद्या मंदिर पर्यंत विविध मार्गावरून भव्य रॅली निघणार आहे.एक सप्टेंबरला महाले यांचा वाढदिवस साजरा होणार असून तत्पूर्वीच बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकात त्यांचे मोठे कटआउट बुलढाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.या कट आउट लावण्यावरूनही वाद झाला अन् पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.(याची बातमी’हॅलो बुलढाणा’ वर प्रकाशित झाली) परिणामी निवडणूक नसतानाही चिखली आणि बुलढाणातील राजकीय तापमान वाढत असल्याची पहावयास मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले आपल्या कार्यकुशलतेमुळे प्रसिद्ध आहेत.पक्ष कोणताही असो त्यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्यातून गेलेले काम ते सहज करून देतात.हीच कार्यशैली त्यांना मोठे बनवते. शिवाय चिखली मतदारसंघाला त्यांच्या पत्नी आमदार श्वेता महाले यांनी चार चाँद लावल्याची त्यांची समर्थक ग्वाही देतात.विकास कन्या म्हणून त्यांना संबोधले जाते.मात्र त्यांच्याच भाजप गडात आमदार संजय गायकवाड यांनी सुरुंग लावायला सुरुवात केली आहे.’एका पेक्षा एक’ असा प्रत्येक आता येणे साहजिक आहे.पाहूया पुढे काय होते ते?











Total Users : 3365992