बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नेपाळ-तिबेट सीमेवरील भागात बुधवारी सकाळी भोटे कोशी आणि त्रिशुली नद्यांना आलेल्या अभूतपूर्व पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार उडाला आहे. काही मिनिटांतच तब्बल ३० फुटांपर्यंत वाढलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने अनेक गावे, जलविद्युत प्रकल्प आणि कैलास-मानसरोवर यात्रेचा मार्ग वाहून नेला. या महाप्रलयात आतापर्यंत १६० जणांचा मृत्यू झाला असून, १३३ भारतीय नागरिकांसह सुमारे ८४४ हून अधिक जण अद्याप बेपत्ता आहेत. दरम्यान नेपाळमध्ये अडकलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी तात्काळ माहिती नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांनी केले आहे.
नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये १५७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर तिबेटच्या केरोंग प्रांतात ३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद चीनी अधिकाऱ्यांनी केली आहे. बेपत्ता ५७९ परदेशी नागरिकांमध्ये अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि मलेशियासह २८ देशांतील पर्यटकांचा समावेश आहे. यात १३३ भारतीय आणि ३७ अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली असून, महाराष्ट्रातील काही नागरिक व पर्यटक अडकले असल्याची माहिती आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असतील, अथवा कुटुंबीयांशी संपर्क होत नसेल, तर घाबरू नका, त्यांच्या कुटुंबीयांनी,
नातेवाईकांनी तात्काळ अधिकृत माहिती नोंदवावी,
“माहिती नोंदणी लिंक” (https://reference-url-citation.invalid/0) याप्रमाणे आहे. नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण, हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक अचूकपणे नोंदवावा तसेच
आपत्कालीन संपर्क ( जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष : ०७२६२- २४२६८३ (पोलीस नियंत्रण कक्ष : ०७२६२- २४२४००)
टोल फ्री : १०७७ मोबाईल : ७०२०४३५९५४ येथे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एकही नागरिक मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाकडून माहिती संकलन व संबंधित यंत्रणांशी समन्वय सुरू आहे.











Total Users : 3351810