बुलढाणा (हॅलो बुलढाणा) येथील शिवसाई परिवाराचे अध्यक्ष तथा उबाठा शिवसेना अमरावती शिक्षक मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख डी. एस. लहाने यांना आगामी अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ही घोषणा सामना या मुखपत्रातून करण्यात आली. शिवसेना सुप्रिमो उध्दव ठाकरे यांनी ही उमेदवारी जाहीर केली.यावेळी शिवसेना राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, सहसंपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर व आमदार तथा खासदार उपस्थित होते.
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक डिसेंबर २०२६ मध्ये अपेक्षित आहे. निवडणुकीसाठी तत्पूर्वीच शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संवाद आणि त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची भूमिका प्रा. डी. एस. लहाने यांनी घेतली आहे. त्यांनी संपर्क प्रमुखाची धूरा सांभाळल्या पासूनच
शिक्षक मतदारसंघ अमरावती विभागातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर संवाद साधण्यासाठी दौरा सुरु केला.
जुनी पेन्शन योजना, प्रलंबित प्रश्न, अनुदान व वेतन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे हक्क, शैक्षणिक गुणवत्ता, डिजिटल सुविधा आणि शाळांच्या पायाभूत सुविधांसारख्या विषयांना प्राधान्य देण्याची भूमिका प्रचार साहित्यामध्ये प्रा.लहाने मांडत आहेत.आता त्यांना शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने यंदाच्या शिक्षक मतदार संघाची निवडणुक चुरशीची होणार आहे.











Total Users : 3352052