बुलढाणा (हॅलो बुलढाणा) साखरेचे दर दिवसेंदिवस वाढत असून ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या तीन दिवसांत साखरेच्या दरात तब्बल १५ रुपयांनी वाढ झालीय.दरम्यान साखरेचे दर निम्म्या किमतीवर आणून दारूचे भाव दहापट वाढवा, अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
सध्या सर्वसामान्यांसाठी साखर कडू झाली आहे. किरकोळ बाजारात साखरेचा दर ६५ रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह विविध सण-समारंभ असल्याने साखरेची मागणी वाढणार आहे. त्यामुळे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.त्यामुळे लाडक्या बहिणीला महागाईचा फटका सहन करावा लागणार आहे.फडणवीस सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यांना आधार मिळाला. पण आता साखर, तेल व इतर अन्य स्वयंपाक घरातील वस्तूंचे भाव कडाडल्याने लाडक्या बहीणीची परीस्थिती चांगली राहीली नाही. लाडक्या बहीणीला सणासुदीत महाग साखर घेणे परवडत नसल्याने हा लाडक्या बहिणीचा अपमान होत असल्याचा आरोप माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केला आहे. साखर, खाद्यतेल कडधान्य इतर स्वयंपाक घरातील पदार्थांचे भाव कौटुंबिक वापरासाठी निम्म्यावर आणावे,त्यामुळे कुटुंब जगेल आणि दारूचे भाव दहापट वाढवावे, त्यामुळे कुटुंब उध्वस्त होईल, मात्र सरकारला महसूल प्राप्त होऊन घाटा भरून निघेल, अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.












Total Users : 3326948