spot_img
spot_img

संतनगरीत जि.प. कर्मचाऱ्यांचा ‘महासंग्राम’! २३ ऑगस्टला शेगावात शक्तिप्रदर्शन; जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाईनदेशकरांच्या कणखर आवाहनाने बुलढाणा जिल्हा एकवटणार!

शेगाव (हॅलो बुलढाणा) जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना धार देण्यासाठी आणि पुढील संघर्षाची दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची बहुप्रतीक्षित केंद्रीय कार्यकारिणी सभा रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी संतनगरी शेगावात होणार आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाईनदेशकर यांच्या कणखर आवाहनामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील कर्मचारी या सभेसाठी एकवटणार असून, शेगावात जि.प. कर्मचाऱ्यांचे अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे.

खामगाव रोडवरील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ असलेल्या ‘हॉटेल श्री गजानन इन’ येथे सकाळी ११ वाजता सभेला सुरुवात होईल. संघटनेचे नवनिर्वाचित राज्याध्यक्ष ॲड. बाबूराव पुजरवाड सभेच्या अध्यक्षस्थानी राहणार असून, यावेळी त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

कर्मचारी चळवळीचे आद्यप्रणेते आणि संघटनेचे संस्थापक ‘कर्मचारी महर्षी’ म. वा. ओंकार यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कर्मचाऱ्यांना एकत्र आणून संघटनेची भक्कम पायाभरणी केली. त्यानंतर माजी राज्याध्यक्ष बलराज मगर यांनी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी अनेक ऐतिहासिक लढे उभारले. संघटनेसाठी आयुष्य वेचणाऱ्या बलराज मगर यांच्या कार्याचा या सभेत विशेष ‘गौरव व कृतज्ञता सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.

सभेमध्ये शासनदरबारी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्या, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, संघटनेचा जमाखर्च आणि आगामी संघर्षाची आक्रमक रणनीती यावर निर्णायक चर्चा होणार आहे.

“ही सभा आपल्याच जिल्ह्यात होत आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ता आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्याने शेगाव गाठून हा सोहळा ऐतिहासिक करावा,” असे बुलढाणा जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाईनदेशकर यांनी ठाम आवाहन केले आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!