जानेफळ (हॅलो बुलढाणा/ अनिल राठोड) जानेफळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारडी येथून एक युवक गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राजू दिगंबर राठोड (वय अंदाजे ३८ ते ४० वर्षे, रा. पारडी, ता. मेहकर) हे दिनांक १२ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडले.
घरातून निघून गेल्यानंतर ते परत न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरात त्यांचा कसून शोध घेतला. मात्र, तीन दिवस उलटूनही राजू राठोड यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता अधिकच वाढली आहे.
राजू राठोड यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास किंवा वर्णनातील व्यक्ती कुठे आढळून आल्यास तातडीने कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माहिती मिळाल्यास संपर्क : गजानन दिगंबर राठोड – ८३२९२८६२२७















Total Users : 3296774