spot_img
spot_img

रोहिणखेड शिवारात शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या! आणखी किती शेतकरी मृत्यूला कवटाळणार?

धामणगाव बढे (हॅलो बुलढाणा/सादिक शेख) शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटना हे ग्रामीण संकट आणि गंभीर कृषी अस्थिरतेचे लक्षण आहे. मोताळ्यातील रोहिणखेड शिवारात ५८ वर्षीय शेतकऱ्याने चिंचेच्या झाडाला गळफास घेवून काल आत्महत्या केली.आणखी किती शेतकरी मृत्यूला असे कवटाळणार? हा कळीचा मुद्दा बनला आहे.

मृतकाचे नाव सुरेश राजाराम राजस (वय ५८, रा. रोहिणखेड, ता. मोताळा, जि. बुलढाणा) असे आहे. १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान रोहिणखेड शिवारातील स्वतःच्या शेतात त्यांनी चिंचेच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले.या प्रकरणी मृतकाचे पुतणे सुरेंद्र रामदास राजस (वय ४६) यांनी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यू क्रमांक २४/२०२६, कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेची नोंद १२ ऑगस्ट रोजी रात्री ११.२९ वाजता करण्यात आली. पुढील तपास ए. एस. आई गजानन पाटील करीत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शेतकरी आत्महत्यांमागे प्रामुख्याने आर्थिक संकट, कर्जबाजारीपणा आणि शेतीमधील तीव्र अनिश्चितता ही मुख्य कारणे आहेत. वरवर पाहता मृत्यूचे कारण समजत नसले तरी, यामागे वर्षानुवर्षे साचलेला मानसिक आणि आर्थिक ताण असतो हे वास्तव कुणीही नाकरू शकत नाही.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!