spot_img
spot_img

POLITICAL BREAKING! जिल्हा बँकेवर दिग्गजांची ‘बिनविरोध’ मोहर! शिंगणे-जाधवांनंतर प्रसेनजीत पाटील संचालक; काँग्रेस जिल्हाध्यक्ष अवचारांसह ज्योतीताई ढोकणेंची माघार… पडद्यामागे नेमकं शिजलं काय?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सत्तासमीकरणांना हादरा देणारी मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा सहकार नेते प्रसेनजीत पाटील यांची बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या समर्थकांनी या विजयाचा जल्लोष करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

यापूर्वी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांचीही जिल्हा बँकेवर बिनविरोध वर्णी लागली होती. आता जळगाव जामोदचे प्रसेनजीत पाटील यांनी त्याच वाटेने थेट संचालकपद गाठल्याने जिल्हा बँकेवरील राजकीय पकड आणि सहकारातील नव्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या घडामोडीत सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील अवचार यांनी घेतलेली माघार! प्रमुख दावेदारांनी ऐनवेळी रणांगण सोडल्यामुळे प्रसेनजीत पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.मात्र ही माघार सहमतीने झाली, राजकीय तडजोडीतून की पडद्यामागील शक्तिशाली डावपेचांमुळे याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे! आणि ज्योतीताई ढोकणे यांच्या पण माघारीने प्रसेनजीत पाटील यांचा मार्ग सुकर झाला

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!