जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) राजसत्तेला धर्म सत्तेची जोड देणारी लोकमाता म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय, असे विचार आ. संजय कुटे यांनी अध्यक्ष स्थानावरुन व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 231 व्या पुण्यतिथी निमित्त संपूर्ण जिल्ह्यात अहिल्या संदेश रथयात्रेचे मार्गक्रमण सुरू आहे त्याच अनुषंगाने आदर्श विद्यालय मानेगाव येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या ‘विचारांचा गजर’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मानेगाव मध्ये सर्व नागरिकांनी अहिल्या संदेश रथ यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले. व नागरिकांनी पूजन केले. व गावातून मिरवणूक काढण्यात आली. यानंतर आदर्श विद्यालय मानेगाव येथे कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संजय कुटे होते.तथा प्रमुख उपस्थितीमध्ये सचिन बाप्पू देशमुख शरदभाऊ वसतकार बंडूभाऊ पाटील संजयजी पांडव अविनाश उमरकर ,शत्रुघन भाऊ पाचपोर, कैलास भाऊ डांगे, अशोक राव देवकते अनंत बोरसे गजानन भाऊ सरोदे, विश्वास पाटील, वामन राव फंड,वसंत मिरगे,किसन राव बाठे,नाजूक सुलताने,मनोहर पाचपोर अशोकराव देवकते,मुख्याध्यापक नेमाडे सर,प्रकाश जुमळे, भारत भाऊ वाघ ,संतोष चिकटे यांच्यासह पंचक्रोशी मधील अहिल्या प्रेमी निलेश साबे, अशोक साबे, विठ्ठल सुशिर, विजय काळदाते, अमित भिवटे, प्रमोद तितरे, अजय तितरे, हरिदास भाऊ वसतकार, शिवदास कात्रे, सुनील भिवटे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मनोहर खाळपे मित्र मंडळी च्या वतीने बाबुराव खाळपे, अंबादास खाळपे, भिका भाऊ भिवटे, सहदेव फंड वासुदेवराव पाटील विजय खाळपे राजू खाळपे,दिलीप गाडगे संदीप वसतकार,रोशन वसतकार संतोष गव्हाळे, अमोल वसतकार परमेश्वर सुशिर, निळू सुशिर, गणेश बोंद्रे, शहादेव भिवटे, ज्ञानेश्वर खाळपे, अनिल गावंडे, संतोष पाचपोर, निखिल बेजोडे, वरणकार मामा, संतोष इंगळे, विकास पाखरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर खाळपे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक नेमाडे सर यांनी केले.










Total Users : 3251711