spot_img
spot_img

BIG EXCLUSIVE | सीओ साहेब, बस करा हो! चिखलीत 46 महिन्यात 11,600 हून अधिक श्वानदंश; जिल्ह्यात आकडा सव्वा लाखापार! या ‘कांडात’ कुणी कुणी धुतले हात?‘धोते जावं… धोते जावं’ नव्हे; चिखलीकर म्हणतात ‘खाते जावं… खाते जावं’ सुरू होतं का? नसबंदीवर लाखो खर्च झाले, तरी हजारो नागरिक कुत्र्यांच्या दाताखाली का?

चिखली (हॅलो बुलढाणा/सय्यद साहिल) भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी प्रकरणाची कागदपत्रे एकीकडे संशयाचे धुके अधिक गडद करत असतानाच आता श्वानदंशाच्या आकडेवारीने अक्षरशः हादरवून सोडले आहे. उपलब्ध माहितीनुसार चिखलीत एका कालावधीत सुमारे चार हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना नोंदल्या गेल्या, तर मागील चार वर्षांचा आकडा 11 हजार 600 पेक्षाही अधिक असल्याची माहिती समोर येत आहे. संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात तर श्वानदंशाच्या घटनांचा आकडा सव्वा लाखाच्या पुढे गेल्याचे सांगितले जात आहे.

सीओ साहेब, नसबंदी झाली तरी कुठे? लाखो रुपयांचा खर्च झाला तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम कुठे दिसतो?

सामाजिक कार्यकर्ते सचिन राठी यांनी आरोग्य विभागाकडून माहिती मागवत या प्रकरणातील आकडेवारी आणि कागदपत्रांचा पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे पालिका प्रशासन, कंत्राटी संस्था आणि बिल मंजुरी प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा आता तपासाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.

एका बाजूला शेकडो कुत्र्यांची नसबंदी केल्याचे दावे, दुसरीकडे हजारोंच्या संख्येने श्वानदंश! मग नागरिकांनी विचारायचे नाही तर काय? ‘धोते जावं… धोते जावं’ एवढ्यावर विषय नाही साहेब! जनतेचा सवाल आता अधिक कडक आहे या संपूर्ण व्यवहारात कुणी कुणी हात धुतले? आणि कुठे ‘खाते जावं… खाते जावं’ सुरू होतं का?

हॅलो बुलढाणा या प्रकरणातील कागदपत्रांचा एक-एक थर उघडणार आहे. प्रशासनाने आता आकडेवारीसह स्पष्ट उत्तर द्यावे!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!