बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दिल्लीत न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीहल्ल्याचे तीव्र पडसाद बुलढाण्यात उमटले. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत संवेदनशील बुलढाणेकरांनी शहरातील मेन मार्केटपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक रॅली काढत आपला संताप व्यक्त केला.
स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करून सुरू झालेल्या या रॅलीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले. दिल्लीतील लाठीहल्ल्याची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी, आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करू नये, तसेच साध्या वेशातील संशयित व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली.
नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना मंत्रिमंडळातून हटवावे, तसेच पेपरफुटी करणाऱ्यांविरोधात कठोर विशेष कायदा करून जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद करावी, अशीही जोरदार मागणी निवेदनातून करण्यात आली












Total Users : 3429411