spot_img
spot_img

देऊळगाव साखरशात पोलिसांचा दणका! महामार्गावरील अतिक्रमणावर कारवाई; दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे दाखल

जानेफळ (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) पोलीस स्टेशन हद्दीतील देऊळगाव साखरशा येथे महामार्गावरील अतिक्रमणावर पोलिसांनी अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. शेगाव–मेहकर महामार्गावर वसलेले हे गाव सुमारे पंधरा ते वीस हजार लोकसंख्येचे असून, बसस्थानक परिसरात नेहमीच मोठी गर्दी व वाहनांची वर्दळ असते. शेगावकडे जाणाऱ्या भाविकांची वाहने, तसेच परिवहन महामंडळाच्या वाढलेल्या बसेसमुळे या मार्गावर वाहतूक अधिक वाढली आहे.

मात्र बसस्थानक परिसरातील काही व्यापाऱ्यांनी रस्त्यावरच अतिक्रमण केल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले. यामुळे किरकोळ भांडणे, अपघाताचा धोका आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वाढली होती. याच पार्श्वभूमीवर दिनांक 18 जून 2026 रोजी जानेफळ पोलिसांनी विशेष मोहीम राबवून महामार्गावर अतिक्रमण करणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर कलम 285 BNS अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी न्यायालयात खटले दाखल करण्यात येत आहेत.

जानेफळ पोलिसांनी देऊळगाव साखरशा बसस्टँडवरील अतिक्रमणधारकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, रस्त्यावर किंवा नागरिकांच्या ये-जा करण्याच्या मार्गात अडथळा निर्माण केल्यास आणखी कठोर कारवाई केली जाईल.

ही कारवाई SDPO मेहकर संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजिनाथ मोरे, पोलीस अंमलदार लक्ष्मण पिटकर व माधव काळे यांनी पार पाडली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!