मलकापूर (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील धानोरा येथील महाराष्ट्र बँकेचे ATM फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेशातील इंदौर येथून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती अर्टिगा गाडी व मोबाईल असा एकूण 5,05,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. 15/06/2026 रोजी फिर्यादी महेश कैलास बुरसे (29, रा. पुसेगाव, ता. सेनगांव, ह.मु. गजानन नगरी, मलकापूर)यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दि. 15/06/2026 रोजी पहाटे 3:36 वाजता धानोरा येथील महाराष्ट्र बँकेच्या ATM मध्ये 2 अनोळखी इसमांनी तोंडाला रुमाल बांधून, हातात लोखंडी रॉड घेऊन ATM मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी ATM मशीनचे नुकसान केले. याप्रकरणी अप.क्र. 125/2026 कलम 305(इ), 324(3), 62 भा.न्या.सं.नुसार गुन्हा दाखल होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.
दि. 16/06/2026 रोजी LCB ला गोपनीय माहिती मिळाली की, ATM फोडण्याचा प्रयत्न करणारे आरोपी इंदौर (म.प्र.) येथील रहिवासी असून पळून जाण्याच्या तयारीत आहेत. माहितीच्या आधारे LCB पथकाने इंदौर शहरात अत्यंत शीघ्र व धाडसी कारवाई करत आरोपी जावेद अयुब खान (38, रा. कबुतरखाना, इंदौर, म.प्र.)यास ताब्यात घेतले.
पकडलेल्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्या ताब्यातून:
गुन्ह्यात वापरलेले वाहन – मारुती अर्टिगा क्र.MP-09-WB-3237किं. 5,00,000/- रु. मोबाईल 01 नग- किं. 5,000/- रु.
असा एकूण 5,05,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी मलकापूर ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आशिष रोही, पोउपनि अविनाश जायभाये, पोहेकॉ शेख चाँद, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, पोका गजानन गोरले, वैभव मगर, चालक पोकॉ शिवानंद हेलगे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे राजु आडवे, ऋषीकेश खंदेराव यांच्या पथकाने केली.










