spot_img
spot_img

फसव्या कर्जमाफीचा जी.आर. जाळला! तुपकरांचा सरकारला इशारा; “सरसकट कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही”

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जळगाव जामोद येथे आज आक्रमक आंदोलन करण्यात आले. शेतकरी नेते रविकांत तुपकर व अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात कर्जमाफीच्या जी.आर.ची होळी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या जोरदार घोषणांनी जळगाव जामोद शहर दणाणून गेले. त्यानंतर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन दिले.

यावेळी रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शासनाने कर्जमाफी जाहीर केली असली तरी त्यामध्ये इतक्या जाचक अटी घातल्या आहेत की राज्यातील दहा-पंधरा टक्के शेतकरीही पात्र ठरणार नाहीत. ही कर्जमाफी नसून शेतकऱ्यांची थट्टा आहे, असा आरोप त्यांनी केला. मोठ्या उद्योजकांचे लाखो कोटींचे कर्ज कोणत्याही अटींशिवाय राईट ऑफ केले जाते; मात्र अन्नदात्याला कर्जमुक्ती देताना सरकार निकषांचा फास लावत आहे, हा अन्याय शेतकरी सहन करणार नाही, असे तुपकर म्हणाले.

सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांना भाव न मिळाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे सरसकट कर्जमुक्ती, सातबारा कोरा आणि हक्काचा पीकविमा मिळाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

तहसील कार्यालयात तुपकरांनी तहसीलदार, कृषी अधिकारी आणि पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तात्काळ सुनावण्या घेऊन अहवाल शासनाला पाठवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला. जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात वादळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना 100 टक्के नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

रविकांत तुपकरांचा अधिकाऱ्यांना ठोकून काढण्याचा इशारा..

यावेळी रविकांत तुपकर यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व पीकविमा कंपनीचे अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले.. पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी घेऊन सुनावण्या घ्या आणि अहवाल शासनाला पाठवून कंपनीला नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना विमा द्यायला लावा अन्यथा एकेकालेला कपडे काढून ठोकेन.. असा गंभीर इशारा दिला. यावेळी तुपकरांच्या आक्रमक भूमिकेमुळे तहसील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!