चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा कडक पाऊल उचलले आहे. आठवडी बाजार परिसरातील सुनील उर्फ लाला हिरालाल चुनावाले, वय 50 वर्ष, रा. आठवडी बाजार, चिखली यास बुलढाणा जिल्ह्यातून दोन महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
मा. उपविभागीय दंडाधिकारी, बुलढाणा यांच्या दिनांक 27 मे 2026 रोजीच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. मुंबई पोलीस कायदा कलम 56(1)(अ)(ब) अन्वये सदर इसमावर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून, आज दिनांक 10 जून 2026 रोजी चिखली पोलिसांनी ही कारवाई अंमलात आणली.
जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली असून, कायदा मोडणाऱ्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकातील पोना अमोल गवई, पोका प्रशांत धंदर, पोका अजय इटावा, पंढरीनाथ मिसाळ, राहुल पायघन, निलेश सावळे, रुपाली उगले यांनी ही कारवाई केली.












Total Users : 3545213