spot_img
spot_img

रायपूर पोलिसांचा हातभट्टी दारू अड्ड्यांवर धडाका! मातला शिवारात 700 लिटर मोह सडवा नष्ट; दोन आरोपींवर गुन्हे दाखल

रायपूर (हॅलो बुलढाणा/सचिन जयस्वाल) पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध धंदेवाल्यांना जोरदार दणका दिला आहे. आज दिनांक 08 जून 2026 रोजी रायपूरचे ठाणेदार श्री. निलेश सोळंके यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मातला शिवारात गावठी दारूचे अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाली.

माहिती मिळताच ठाणेदार निलेश सोळंके यांनी बिट अंमलदार आशिष काकडे, पोलीस अंमलदार राहुल जाधव, दशरथ जवादे यांच्या पथकासह मातला शिवारात अचानक धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे अड्डे उध्वस्त केले.

कारवाईदरम्यान 25 लिटर गावठी हातभट्टी दारू आणि तब्बल 700 लिटर मोह सडवा असा एकूण 38 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तो जागेवरच नष्ट करण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अवैध दारू विक्री आणि निर्मितीमुळे ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असताना रायपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे हातभट्टी माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!