spot_img
spot_img

सिंदखेडराजात गोरक्षकांवर हल्ला; ‘हॅलो बुलढाणा’च्या बातमीनंतर संताप उसळला, रस्ता रोकोने शहर दणाणले!

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा) शहरात काल भरदिवसा बसस्थानक परिसरात घडलेल्या मारहाणीच्या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली. ‘गो सन्मान आवाहन अभियान’ अंतर्गत राजस्थान येथून आलेले गोरक्षक महाराज देऊळगावकडून सिंदखेडराजाकडे येत असताना, संशयास्पद वाहनाबाबत विचारणा केल्याच्या कारणावरून काही जणांशी वाद निर्माण झाला. हा वाद वाढताच हिंसक जमावाने थेट बसस्थानक परिसरात गोरक्षकांना लाठ्या-काठ्या आणि दंडाने बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच हिंदू संघटना, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि गोरक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली. विशेष म्हणजे हॅलो बुलढाणाने ही बातमी सर्वप्रथम प्रसारित करताच प्रशासनही खडबडून जागे झाले. आरोपींना तात्काळ अटक करा, गोरक्षकांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करा, तसेच शहरातील मुख्य प्रवेशद्वार व बसस्थानक परिसरातील अनधिकृत मटणाची दुकाने हटवा, या मागण्यांसाठी शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर धाव घेतली.

यानंतर बसस्थानकासमोर तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. काही काळ वाहतूक खोळंबली असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आंदोलकांनी पोलिस प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली.

दरम्यान, या प्रकरणातील आठ जणांपैकी सहा जणांना पोलिसांनी अटक केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करून कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आता या प्रकरणात पोलिस पुढे किती कठोर पावले उचलतात, याकडे संपूर्ण सिंदखेडराजासह बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!