spot_img
spot_img

देऊळघाटमध्ये LCB चा दणका! 5.78 लाखांचा गुटखा पकडला; स्विफ्ट डिझायरसह चालक ताब्यात

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला आणि मानवी आरोग्यास घातक गुटखा व सुगंधित पान मसाला विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्यांवर बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. देऊळघाट परिसरात सापळा रचून तब्बल 5 लाख 78 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी प्रतिबंधित गुटखा विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या मार्गदर्शनाखाली पथक सक्रिय झाले होते. 7 जून रोजी गुप्त माहिती मिळाल्यानंतर बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील देऊळघाट येथे पथकाने सापळा लावला.

यावेळी मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर क्रमांक MH-28-ET-5300 या वाहनातून प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाला आढळून आला. पोलिसांनी चालक शेख सलीम शेख ईस्माईल, वय 59 वर्षे, रा. सैलानीनगर, चिखली याला ताब्यात घेतले.

या कारवाईत 3 लाख 28 हजार 900 रुपयांचा गुटखा आणि 2 लाख 50 हजार रुपयांचे वाहन, असा एकूण 5.78 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!