spot_img
spot_img

कोऱ्हाळा बाजारच्या पाण्यावर संकट! पिंपळगाव धरणातून पाइपलाइनने विहिरीत पोहोचल्या मृत माशा; परिसरात दुर्गंधी

मोताळा (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील कोऱ्हाळा बाजारला पाणीपुरवठा करणाऱ्या पिंपळगाव धरणातून पाइपलाइनच्या साहाय्याने थेट गावातील विहिरीत मृत मासे पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उन्हाळा सरत असताना धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली असून कडक उन्हामुळे पाणी अतिगरम झाले आहे. याच कारणामुळे धरणातील शेकडो मासे मृत झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे मृत मासे पाइपलाइनमधून विहिरीत आल्याने विहिरीतील पाणी काहीसे सिल्वर रंगाचे दिसू लागले आहे. धरण आणि विहीर परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

संबंधित प्रशासनाने तातडीने पाण्याची तपासणी करून विहीर व पाइपलाइन स्वच्छ करावी, तसेच नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!