बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे बुधवार, ३ जून २०२६ रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सकाळी १०.३० वाजता संभाजीनगर येथून ते बुलढाणा विश्रामगृह येथे आगमन करतील. त्यानंतर सकाळी ११ वाजता रामनगर येथील वारकरी भवनात शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत स्थानिक संघटनात्मक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दुपारी ३ वाजता ते बुलढाणा विश्रामगृह येथून नाशिककडे प्रयाण करतील. जिल्हा प्रशासनाकडून दौऱ्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.










Total Users : 3274320