जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा / ज्ञानदेव राजनकर) येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सोमवारी (१८ मे) केंद्र सरकारविरोधात तीव्र आक्रमक भूमिका घेत निवेदन सादर करण्यात आले. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे निवेदन पाठवण्यात आले.
नीट परीक्षा पेपरफुट प्रकरणामुळे देशभरातील सुमारे २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या भविष्यावर गदा आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला. या घोटाळ्यातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करावे, तसेच जलदगती न्यायालयात सुनावणी घेऊन दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. याचबरोबर या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशीही ठाम भूमिका मांडण्यात आली.
काँग्रेसने शिक्षण क्षेत्राच्या वाढत्या व्यापारीकरणावरही निशाणा साधत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेला ‘खेळ’ थांबवण्याची गरज अधोरेखित केली. दुसरीकडे, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधत अनेक पेट्रोल पंपांवर कॅनमध्ये डिझेल नाकारले जात असल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर १५-२० किमी दूर न्यावे लागत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला.
वाढती महागाई आणि पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका करत इंधन दर तात्काळ कमी करण्याची मागणी करण्यात आली. “शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी स्वातीताई वाकेकर, ज्योती ढोकणे, रामविजय बुरुंगले, प्रकाश पाटील, राजीव घुटे,स्वातीताई वाकेकर, ज्योतीताई ढोकणे,रामविजय बुरुंगले, प्रकाश पाटील,राजीव घुटे, समाधान दामदर अच्छे खा पठाण, कैलास बोडखे, डॉक्टर प्रशांत राजपूत अविनाश उमरकर तालुका अध्यक्ष ऍड भालेराव, शहर अध्यक्ष अमर पाचपोर, राजू पाटील, तुकाराम गटमने, अजय राजपूत,परवीन ताई देशमुख नगरसेविका वैशाली तायडे, मीना ताई सातव, भारसाकळे सर दिनेश काटकर, सुरेश वानखडे ऍड रतन इंगळे, शंकर म्हस्के, श्रीकृष्ण केदार,ऍड संदिप मानकर, ऍड काकडे, ओ पी तायडे , आसिफ इकबाल,सै. हुसेन राही जुनेद शेख, शहर कार्याध्यक्ष नासिर भाई, अझर देशमुख,वकील खान, बाबूभाई जमादार, अयाज भाई,निलेश तायडे, धनंजय बंबटकार ,अनिल इंगळे,अफरोज भाई, प्रभुदास बंबटकर, है.तौफिक, मारोती सुरडकर, नितीन जाधव मन्सूर भाई यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










