spot_img
spot_img

१२ वर्षांनंतरही गोडे साहेबांचा प्रभाव तसाच जिवंत!

बुलढाणा, दि. २१ (हॅलो बुलढाणा) इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी मंत्री स्व. डॉ. राजेंद्रजी गोडे साहेब यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त आज समाधीस्थळी भावनिक वातावरणात अभिवादन करण्यात आले. गोडे साहेबांच्या कार्याची आठवण काढताना उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तर हृदयात अभिमान दाटून आला.

यावेळी श्रीमती उषाताई राजेंद्रजी गोडे, डॉ. योगेशजी गोडे, डॉ. सौ. स्मिताताई गोडे, राहुलभाऊ गोडे यांच्यासह सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोडे साहेबांनी शिक्षण, समाजकारण आणि राजकारणात उभा केलेला आदर्श आजही प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

गोडे साहेब हे केवळ नेता नव्हते, तर जनतेच्या हक्कासाठी झटणारे खरे जननायक होते, अशा शब्दांत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या कार्याची परंपरा पुढे नेण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!