spot_img
spot_img

बुलढाण्यात जनगणना 2027 ला दमदार सुरुवात; माहिती न दिल्यास कारवाईचा इशारा!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात भारताच्या जनगणना 2027 कार्यक्रमाची 16 मे 2026 पासून अधिकृत सुरुवात झाली असून यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होत आहे. प्रशासनाने या मोहिमेला वेग देत दोन टप्प्यांमध्ये संपूर्ण प्रक्रिया राबविण्याचा निर्धार केला आहे. पहिल्या टप्प्यात 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान घरगणना केली जाणार असून, दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये पार पडणार आहे.

शहरातील 129 घरगट तयार करून 117 प्रगणक आणि 19 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रगणक प्रत्येक घराला भेट देत केवळ 5 ते 10 मिनिटांत मोबाईल अ‍ॅपद्वारे माहिती नोंदवणार आहेत. प्रत्येक घराला स्वतंत्र ओळख क्रमांक दिला जाणार आहे.

प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, जनगणना ही केवळ औपचारिकता नसून भविष्यातील विकास योजनांचा पाया आहे. नागरिकांनी चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. जनगणना कायद्यानुसार माहिती देण्यास नकार देणे हा दंडनीय गुन्हा आहे.

मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रगणकांना अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे. बुलढाण्याच्या विकासासाठी ही संधी गमावू नका, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!