spot_img
spot_img

BREAKING डायल 112 मुळे मोठा अनर्थ टळला! 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह बुलढाणा शहर पोलिसांकडून रोखला; परिसरात खळबळ

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरात पुन्हा एकदा बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक कुप्रथेवर पोलिसांनी मोठी आणि निर्णायक कारवाई करत संभाव्य अनर्थ टाळला आहे. दिनांक 14/05/2026 रोजी रात्री 9.30 वाजता डायल 112 वर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ग्राम माळविहीर शिवार, खामगाव रोड, संतनगरी परिसर येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह 15/05/2026 रोजी लावण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले.

माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. महिला व बालविकास विभाग तसेच चाईल्ड हेल्पलाईनच्या पथकासोबत संयुक्तपणे तपासणी करून माहितीची खात्री करण्यात आली. त्यानंतर होणारा बालविवाह तातडीने थांबवण्यात आला.

या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, सामाजिक स्तरावर चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी संबंधित कुटुंबीयांना समज देत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या आदेशाने सपोनि युवराज रबडे व पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!