बुलढाणा (हॅलो बुलडाणा) संदीप शेळके शिवसेना (उबाठा) पक्षाला सोडचिट्ठी देत काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. पुढील आठवड्यात मुंबई येथील काँग्रेस कार्यालयात, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे समजते.
युवा उद्योजक म्हणून ओळख असलेल्या शेळके यांनी बुलढाणा लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे गटात अस्वस्थता वाढली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात आधीच संघटनात्मक मरगळ जाणवत असताना शेळके यांचा निर्णय हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शेकडो कार्यकर्त्यांसह होणारा हा प्रवेश आगामी राजकारणाची दिशा बदलणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.











