बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मिशन परिवर्तन अंतर्गत मलकापूर येथे एम डी ड्रग्ज बाळगणाऱ्या आरोपीला एलसीबीने जेरबंद करीत एकूण 6.25 ग्रॅम एम डी ड्रग्जसह एकुण 41 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे. मोहसीन इजाज सय्यद 27 रा. पारपेठ गुरुद्वारा, मलकापूर असे आरोपीचे नाव आहे.
एलसीबी चे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वातील पथक 25 सप्टेंबर रोजी मलकापूर शहरात गस्त घालत असताना, मोहसीन इजाज सय्यद हा आरोपी पोलिसांची गाडी दिसतात पळाल्याने पोलिसांनी संशयस्पद हालचालीवरून त्याला ताब्यात घेतले.त्याची अंग झडती घेतली असता,
आरोग्याला अंत्यत घातक असलेले 6.25 ग्रॅम वजनाचे व 31 हजार 400 रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज (मेफेडॉन ) आढळून आले. पोलिसांनी ड्रग्स 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल सुद्धा जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध एनडीपीएस ॲक्ट नुसार कलम 8 (क), 22 (ब) नुसार मलकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालीपोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोहेकॉ दीपक लेकूरवाळे, शेख चांद गणेश पाटील,गजानन गोरले,आशा मोरे,सुरेश भिसे, ऋषिकेश खंडेराव या पथकाने केली आहे.















Total Users : 3301781