बुलढाणा (हॅलो बुलडाणा) वृत्त क्षेत्रात ‘हॅलो बुलढाणा’ वेब पोर्टल अल्पावधीतच लोकप्रिय झाले. या पोर्टलवर वेगवान व शोधक न्यूज देण्यात येते. या मागे संपादक व पत्रकारांची प्रचंड मेहनत असून ‘हॅलो बुलढाणा’ एक नंबर वर असल्याचे कौतुकास्पद विचार आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केले. यावेळी राजकीय भाष्य करताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘महाविकास आघाडी’च आघाडीवर राहणार असल्याचा दावा केला आहे.
आज मंगळवारी कारंजा चौकातील ‘हॅलो बुलढाणा’ कार्यालयाला मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी भेट दिली. सुरुवातीला ‘हॅलो बुलढाणा’ च्या वाढत्या लोकप्रियतेवर चर्चा झाली. समाजाचा सैनिक होऊन असाच वृत्त धर्म निभवावा, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्ह्यातील विविध विषयांवर देखील चर्चा करण्यात आली. पुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘महाविकास आघाडी’च आघाडीवर राहील असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.याप्रसंगी मेहकरचे शिवसेना शहर प्रमुख किशोर गारोळे, ॲड. आकाश घोडे, जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, संपादक जितेंद्र कायस्थ, संचालक राजेंद्र कायस्थ, सिटी न्यूज जिल्हा प्रतिनिधी सुनील मोरे,बाळा राऊत,दीपक मोरे, दैनिक जनसंचलन उपसंपादक अजय राजगुरे,शुभम कायस्थ, यश कायस्थ, टिल्लू गोरले, ओम कायस्थ,तिरुप परदेशी, टीम ‘हॅलो बुलडाणा’ चे सर्व मान्यवर सदस्य उपस्थित होते.