देऊळघाट (हॅलो बुलडाणा) देऊळघाट येथील एका भ्रष्ट ग्रामसेवक विरोधात एकाने उपोषण छेडले. भ्रष्टाचारी ग्रामसेवकां विरोधात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
देऊळघाट येथे २ मे रोजी ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत उपसरपंच आरिफ खान हबीब खान यांनी देऊळघाट येथील विविध प्रश्न व समस्या बाबत तसेच ग्रामपंचायत ची मासिक सभेची प्रोसिडिंग नक्कल ८ व्या वित्त आयोगातील साहित्य पुरवठाचे कोटेशन स्टेटमेंट कॅशबुक साहित्य पुरवठाच्या आदेशाच्या प्रती गावात बसविलेल्या सोलार लाईट बाबतची माहिती ग्रामसभेत मागितली असता सरपंच समक्ष ग्रामसेवक यांनी उपरोक्त माहिती न देता उडवा उडवीचे उत्तरे देऊन धुडकावून लावली. त्यामुळे उपसरपंच आरिफ खान हबीब खान व ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक सेठ सदस्य विकास देशमुख माजी तंटामुक्ती अध्यक्ष जूनैद खान फखरूललाह खान सदस्य अरबाज अन्सारी उर्फ( गुड्डू) कार्यकर्ते सय्यद जुनैद इत्यादीने ग्रामसेवकाविरुद्ध आवाज उठून बुलढाणा पंचायत समिती गाठून माननीय विस्तार अधिकारी (B.D.O ) यांचे दालनामध्ये ठिय्या आंदोलन ठोकले.दरम्यान पंचायत समिती कर्मचाऱ्यांची तारांबळ उडून विस्तार अधिकारी (B.D.O) यांना उपोषण स्थळी बोलविण्यात आले व उपरोक्त प्रश्न संबंधि सविस्त चर्चा होऊन उपोषणकर्त्याचे मागण्याची २४ तासाचे आत पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे उपोषणकर्त्यांचे उपोषण तात्पुरता स्थगित करण्यात आले. २४ तासाच्या आत मागण्याची पूर्तता न झाल्यास यापेक्षाही उग्र आंदोलन उपोषण हे जिल्हा परिषद चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे दालनात करण्याच्या इशारा सुद्धा देण्यात आला.




Total Users : 3596900