अमडापूर (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात शहरासह काही ठिकाणी गांजा विक्री होत असून, अमडापूर पोलीसांनी चिखली तालुक्यातील उदयनगरात एका आरोपीच्या घरातून तब्बल 11 किलो 20 ग्रॅम गांजा जप्तीची कारवाई 28 मे रोजी केली आहे. या जप्तीच्या गांजाची
किंमत एकुण 2 लाख 20 हजार 400 रुपये इतकी आहे.महेश राजेंद्र महानकार (25) रा. इंदिरानगर वॉर्ड नंबर 4, उदयनगर, ता. चिखली, जि. बुलढाणा असे आरोपीचे नाव आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात अमडापूर हद्दीत गांजा जप्तीची कारवाई एलसीबीच्या पथकाने केली आहे.आरोपी महेश राजेंद्र महानकार रा. इंदिरानगर येथील घरात गांजा नामक अंमली पदार्थ अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आला.पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन 11 किलो 20 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.आरोपी विरुद्ध कलम 8(C), 20 (II),(B) NDPS नुसार गुन्हा दाखल करून अमडापूर पोलिसांकडे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे.एपीआय संजय मातोंडकर, एचसी गणेश पाटील,चाँद शेख
पीएन युवराज राठोड,पीसी दीपक वायाळ, विजेता पवार, ऋषि थूट्टे,हर्षल जाधव, दीपाली चव्हाण, चालक निवृत्ती पुंड, कैलास ठोंबरे या पथकाने ही कारवाई केली.










