बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा पोलीस दलाचा कान व डोळा असणारा एलसीबी विभाग किचकट गून्ह्याचा शोध लावतोच! आताही महावितरणच्या ॲल्युमिनियम तार चोरीतील फरार असल्या 3 गुन्ह्याची उकल करीत, 3 आरोपींना अटक करून 3 लाख 4 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्याची धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात महावितरणच्या विद्युत पोलवरील विद्युत वाहक तार चोरून नेण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. याचा तपास सुरू होता.जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामुळे एलसिबीने तपासचक्र फिरविले.दरम्यान 3 आरोपी निष्पन्न झाले आहे.संतोष पावरा, बेलरसिंग पावरा,शेख सईद तिघे (रा.पिंपळगाव राजा ता.जळगाव जामोद ,जि.बुलढाणा) असे आरोपींची नाव आहेत. त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 3 लाख 4 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.यामध्ये सोने-चांदीसह एसीई कंपनीची कार,35 किलो वजनाची ॲल्युमिनियम तार याचा समावेश आहे.आरोपींवर भारतीय विद्युत कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. आरोपी हे विद्युत तार भंगार व्यापाऱ्याकडे विकत होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे,अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, बीबी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचे नेतृत्वात सपोनि यशोदा कणसे, पोहेकॉ एजाज खान,गणेश पाटील,गोपाल तारुळकर, शिवानंद हेलगे यांनी केली.










