खामगाव (हॅलो बुलडाणा) चिकन सेंटरवर अंडे विकत घेण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन 9 वर्षीय मुलीवर 19 वर्षीय चिकन सेंटर वरील आरोपीने पन्नास रुपयांची नोट दाखवून तिच्यावर दुकानात अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे 14 मे रोजी उघडकीस आली. रेहान खान मुक्तार खान,पेठ पुरा, पिंपळगाव राजा असे आरोपीचे नाव आहे.
पिंपळगाव राजा येथील पीडित 9 वर्षीय मुलगी ही अंडे घेण्यासाठी किराणा दुकानात गेली होती.दरम्यान आरोपीच्या चिकन सेंटर समोरून ती जात असताना तिला आरोपीने 50 रुपयांच्या नोटीचे आमिष दाखविले.तिला बोलावून 50 रुपये दिले आणि दुकानातच तिच्यावर अत्याचार केला.आरोपी आणि पीडित मुलगी एकाच मोहल्यात राहतात.पीडिताची आई मरण पावली आहे तर वडील मजुरीचे कामावर गेलेले होते.त्यामुळे पीडिता हिने सदर घटनेबाबत तिच्या मोठी आईला सांगितले.दरम्यान या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यावर पोलिसांनी तपास चक्र फिरविले.मात्र आरोपी फरार झाला होता.तांत्रिक माहिती द्वारे आरोपीचा शोध घेण्यात येऊन नांदुरा येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.आरोपी विरुद्ध कलम 64 (1),64(2) BNS सह कलम 4,6,10,( m) पोक्सो प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बर्वे करीत आहेत.










