spot_img
spot_img

💥EXCLUSIVE! जिल्हा रुग्णालयातील घोटाळ्याचा मुद्दा नव्याने विधानसभेत ! – आ.संजय गायकवाड करणार भष्ट्राचाऱ्यांवर कारवाईची शस्त्रक्रिया!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बनावट खरेदीची बिलं दाखवित बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात केलेल्या कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टचार प्रकरणातील दोषी भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे हल्ली मुक्काम गोरक्षण रोड परीसर अकोला त्या भ्रष्टाचार घोटाळ्याचा मुद्दा आज विधानसभेत पुन्हा गाजला. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी यासंदर्भात आवाज उठविला आहे.त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. यापूर्वीही चार वेळा तारांकित प्रश्न लावण्यात आले होते परंतु कारवाई संथ गतीने सुरू आहे.

बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात साहित्य आणि औषधींची खरेदी केल्याचे दाखविण्यात आले होते. या खरेदीपोटी दाखविण्यात आलेली बिलं बनावट असल्याचे उघडकीस आले होते. यासंदर्भात आमदार संजय गायकवाड यांनी अर्थसंकल्पीय 2025 अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. आमदार संजय गायकवाड यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या चौकशीनंतरही सत्य बाहेर आले नाही. त्यामुळं आमदार संजय गाकवाड यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळीअधिवेशनादरम्यान विधानसभेत हा विषय पुन्हा मांडला. आरोग्य विभागातील जे अधिकारी दोषी आहेत, त्यांच्याच हाती चौकशी सोपविण्यात आल्याबद्दल आमदार गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. दोषी व्यक्तींकडून कशी काय चौकशी केली जाऊ शकते असा प्रश्न त्यांनी मंत्र्यांना विचारला होता.साहित्य आणि औषध घोटाळ्यात सहभागी असलेल्या व्यक्तींनी चौकशी अधिकाऱ्यांना सहकार्य केले नाही. आवश्यक ती कागदपत्रं पुरविली नाही, असे आ.गायकवाड यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले होते. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना संबंधित कर्मचारी सहकार्य करीत नसल्यानं त्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली होती. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याकडे आमदार गायकवाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे लक्ष वेधले होते. परंतू अद्यापही तपास संथ गतीने सुरू आहे.त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी आज विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करीत शासनाचे लक्ष वेधले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!