बुलढाणा (हॅलो बुलडाणा) येथील त्रिशरण चौकात स्नेहल या तरुणीचा १० फेब्रुवारीला वेदनादायी अपघातात मृत्यू झाला होता.या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या आरोपी मद्यधुंद चालकाने जमानत पत्र सादर केले होते परंतु येथील सत्र न्यायालयाने त्याची जमानत फेटाळून लावली आहे.
बुलढाणा येथील त्रिशरण चौकात मन सुन्न करणारी ही अपघाताची घटना १० फेब्रुवारी २०२५ रोजी घडली होती. एका मद्यधुंद बोलेरो पिकअप चालकाने दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाठीमागून येवून भरधाव वेगाने तरुणीच्या स्कूटीला धडक दिल्याने स्नेहल खाली पडली आणि सदर चालकाने आपली गाडी न थांबवता तिच्या शरीरावरून भरधाव वेगाने गाडी नेल्याने तिचा जागीच तडफडून मृत्यु झाला होता. या घटनेमुळे समाजभावना दुखावल्या असून जनतेमध्ये खूप आक्रोश पाहायला मिळाला. तसेच सदर घटनेच्या विरोधात स्नेहल हिला न्याय मिळण्यासाठी १३ फेब्रुवारी २०२५ रोजी चांडक ले-आउटच्या बोर्डपासून ते त्रिशरण चौकापर्यंत मोठ्या प्रमाणत कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. आरोपी याने दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा व सत्र न्यायालय , बुलडाणा येथे जमानत अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरणामध्ये स्नेहल चौधरी तर्फे ॲड.श्रीवेद इंगळे यांनी आरोपीच्या जमानत अर्जास तीव्र विरोध केला होता. दिनांक ०३ मार्च २०२५ रोजी विद्यमान अति-सत्र न्यायालय, बुलडाणा यांनी आरोपीचा जमानत अर्ज नामंजूर केला आला आहे.










