जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात वाळू घाटांचा लिलाव झालेला नाही परंतु,वाळू तस्कर पुष्पा रात्री आपला खेळ खेळतात. या खेळात प्रशासकीय अधिकारी सुद्धा सहभागी असल्याचा आरोप होत आहे.
शासनाने वाळूघाटांचा लीलाव केलेला नाही. परिणामी दिवसा शांत झोपा काढत रात्री मात्र वाळू तस्कर जोरात तस्करी करतात. गाडी पकडली तर तात्काळ दंड भरतात. परंतु दंड न भरता ही वाळू तस्करीची नवीन शक्कल एका अज्ञात रेतीत तस्तराने काढली.
काही दिवसांपूर्वी अथक परिश्रम घेत पाठलाग करत तहसीलदार यांनी बिना क्रमांक ची वाळूने भरलेली गाडी वाहतूक करताना पकडली. अथक परिश्रमाने ती गाडी तहसील समोर आणून लावली. दिवसा जप्त, रात्री मुक्त – रेती तस्करीचा धक्कादायक प्रकार! समोर आला आहे सदर वाळू गाडीचा मालक हा बनावट चाबीने रात्री सदर गाडी ताब्यात घेऊन रात्रभर रेती तस्करी करते आणि दिवस उजाळायच्या आत ती गाडी जागचेवर तहसील समोर उभी आणून ठेवते. असा प्रकार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी महसूल विभागाच्या लक्षात आला आहे. सदर टिप्पर ला मागून पुढून कुठलाही नंबर नाही.
▪️’आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल!
ही वाळूची गाडी पाठलाग करून पकडली तेव्हा तहसीलदाराच्या गाडीमागे सुद्धा काही जणांनी मोटर सायकलने पाठलाग केला होता. रेती तस्करांच्या दादागिरी पुढे मंडल अधिकारी तलाठी सुद्धा हतबल होतात. महसूल विभाग महत प्रयासाने रेती तस्करीच्या गाड्या पकडतात परंतु नंतर दंड भरून अथवा न्यायालयातून त्या सुटतात. ही रेती तस्करी ची गाडी पकडली तेव्हा रेती तस्करांच्या काही व्हाट्सअप ग्रुप वर “आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल” असे व्हिडिओ झळकले तहसीलदार यांची गाडी रेतीच्या गाडीचा पाठलाग करताना सुद्धा ह्याच व्हिडिओ व्हायरल झाले होते. राज्यातील इतर भागात रेती तस्करांकडून होत असलेल्या दहशतवादी घटना, यामुळे महसूल विभाग हतबल झाला आहे.










