spot_img
spot_img

💥क्राईम! जेवण पडले तब्बल 90,000 रुपयात! – पाठलाग करून दीड तोळ्याची सोन्याची चैन हिसकावली!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अलीकडे बुलढाणा शहरात क्राईम वाढतेय. हॉटेलवर जेवण करून परत येत असताना, तब्बल दीड तोळ्याची सोन्याची चैन दूचाकीस्वार दोन अनोळखी इसमांनी हिसकावून नेल्याची तक्रार समोर आली आहे.

तक्रारीनुसार, सुमित वसंत अंभोरे रा. तार कॉलनी सुंदरखेड बुलढाणा हा 20 फेब्रुवारी रोजी आते भाऊ महेंद्र किशोर मोरे राहणार एकता नगर बुलढाणा हे चिखली रोडवरील वसंत हॉटेल येथे रात्री आठ वाजताच्या सुमारास जेवण करायला गेले होते.दरम्यान स्कुटीने घरी परतत असताना चांडक लेआउट येथे पाठीमागून बजाज पल्सर या दुचाकीवर दोन अनोळखी इसम आले व म्हणाले की, आमच्या गाडीला टक्कर दिली.या कारणावरून ते दोघेही स्कुटीच्या मागे लागले.रात्री साडेअकरा वाजता च्या दरम्यान त्रिशरण चौक येथे खामगाव रोडने वळण घेत असताना,स्कूटीचे चाक खड्ड्यात गेल्याने तक्रारदार खाली पडला. दरम्यान पाठीमागे लागलेल्या अज्ञात 2 व्यक्तींनी सुमित वसंत अंभोरे याच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घेतली व मलकापूर मार्गाने बजाज पल्सर या दूचाकीने पळ काढला..अशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!