spot_img
spot_img

💥भीषण! – दुचाकीस्वाराचा चिरडून जागीच मृत्यू! – बाळापुर खामगाव हायवेवर अपघात!

खामगाव (हॅलो बुलडाणा) अपघातांच्या घटनेत वाढ होत असून दोन ते अडीच तासापूर्वी बाळापुर खामगाव हायवे वर एका दुचाकीचा भीषण अपघात झाला.या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.संतोष शर्मा अकोला असे मृतकाचे नाव समजते.ते शेगाव येथील स्व. दामोदर झाडोलीया यांचे जावई असल्याचेही कळते.

संतोष शर्मा हे एम एच 28-बी एस 2240 या क्रमांकाच्या दुचाकीने जात होते.अपघात नेमका कसा झाला याची माहिती मिळाली नाही परंतु संतोष शर्मा हे चिरडल्या गेल्याने जागीच ठार झाले आहेत.त्यांच्या डोक्यावरूनच वाहन गेल्याचे प्राथमिक चित्र आहे. शेगाव येथील स्व. दामोदर झाडोलीया यांचे ते जावई असल्याचेही कळते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!