spot_img
spot_img

💥BREAKING! चिंचोले चौकात युवकावर जीवघेणा हल्ला! – चाकू खूपसून एक जण फरार!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात दिवसागणिक हाणामारी, चिडीमारीचे प्रकार वाढले असून गुन्हेगारी डोके वर काढत आहे. काल येथील चिंचोले चौकामध्ये एका चहाच्या दुकानाजवळ रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान जीवघेणा हल्ला झाला असून यात एक युवक गंभीर जखमी आहे. बरडे गल्ली येथील साहिल कारंजे (वय 22) याच्या पोटात चाकू खूपसून एक जण फरार झाला आहे.

एमडी चहाच्या दुकानाच्या बाजूला आपल्या मित्रांसोबत साहिल बसलेला होता. त्याठिकाणी अमय चव्हाण (रा. सुंदरखेड) नावाचा त्याच्याच ओळखीचा युवक पोहोचला. दोघांमध्ये बाचाबाची झाली की नाही, हे माहिती नाही पण अमयने साहीलच्या पोटात चाकू खुपसल्याचे प्रत्यक्षदर्शिनी पाहिले. यावेळी अमय सोबत आणखी एक जण असल्याचेही कळते.चाकूहल्ल्यानंतर अमय फरार झाला. इकडे जखमी साहिलला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले परंतु त्या ठिकाणाहून लगेचच एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले आहे.साहिलवर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून ठाणेदार नरेंद्र ठाकरे आणि युवानेते मृत्युंजय गायकवाड माहिती मिळाल्याबरोबर हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!