चिखली (हॅलो बुलडाणा) बुलढाणा शहरातील 3 बारक्यांनी अर्थात 15 ते 17 वयोगटातील चोरट्यांनी देवालाही सोडले नाही.चिखली तालुक्यातील हातनी शिवारातील कालभैरव मंदिरात या चोरट्यांनी मंदिरात कुलूप करवतीने कापून दानपेटी देखील फोडली.तांब्याचा घंटा देखील चोरून नेण्याचा त्यांचा पक्का इरादा होता परंतू त्यांचा हा डाव फसला असून या चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे चोरटे तुळशी नगर बुलढाणा,अंत्री तेली हल्ली मुक्काम महावीर नगर बुलढाणा, केशवनगर बुलढाणा येथे राहतात. (चोरटे15 ते 17 वयोगटातील असल्याने ‘हॅलो बुलडाणा’ त्यांची नावे टाळत आहोत)
चिखली तालुक्यात चिखली ते बुलढाणा रोडवर श्री भैरवनाथ सेवा ट्रस्टचे हातनी येथे भैरवनाथचे मंदिर आहे.मंदिराला लोखंडी दरवाजा आहे.मंदिरात साडेतीन फूट उंचीची तीन पत्राची लोखंडी दानपेटी आहे.मला मोठा पाच किलो वजनाचा तांब्याचा घंटा आहे.रात्री आठ साडे आठ दरम्यान बुलढाणा येथील चोरट्यांनी मंदिराचे कुलूप करवतीने कापले.मंदिरात प्रवेश करून दानपेटीची कुलपही अर्धवट कापले होते.घंटा तोडून खाली ठेवला होता.दरम्यान गावातील दोन ते तीन व्यक्तीं दर्शनासाठी मंदिरावर गेले असता त्यांना चोरीचा संशय आल्याने त्यांनी आत पहिले तर चोरटे आपली करामत करताना दिसले.दरम्यान तिन्ही व्यक्तींनी या चोरट्यांना कोंडून ठेवले.मंदिरचे सचिव रवी अमरसिंग जाधव यांना याबाबत कळविले असता त्यांनी पोलिसांना माहिती देऊन तिन्ही चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.










