चिखली (हॅलो बुलडाणा) रस्त्याने जात असताना एका दुचाकीस्वाराला दुचाकी बाजूला घे म्हणत एका मॅरीस कार चालकाने अश्लील शिवीगाळ करत डोक्यावर फायटरने मारत ‘ गाडी सरका..नही तो रिव्हाल्वर निकालता..!’अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना चिखली येथे घडली आहे.
घटना अशी आहे की, आदित्य प्रशांत गुप्ता
रा.गांधीनगर चिखली हे परिसरातील अपराजीत मेडीकल स्टोअर्स बस स्टॅन्ड समोर मुलगी आजारी असल्याने औषध आणण्यासाठी टीव्हीएस रोनिन ही दूचाकी घेऊन गेले होते.परंतु औषध मिळाले नसल्यने ते मुलीला घेवुन दूचाकीकडे आले. आदित्य गुप्ता दूचाकीवर बसत असतांना त्यांच्या पाठी मागुन प्रिंन्स उर्फ केदार प्रंशात जैस्वाल रा. खामगाव रोड चिखली ता. चिखली जि. बुलडाणा हा त्याची मॅरीस कार घेऊन ‘जल्दी गाडी निकाल’ म्हणत अश्लील शिवीगाळ करू लागला.तेव्हा गुप्ता यांनी तोंड सांभाळून बोल असे म्हटले असता,आरोपी जयस्वालने गाडीच्या खाली उतरून स्वीगाळ करत डोक्यावर फायटरने मारहाण केली. सदरची घटना ही बालाजी मेडीकल दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. आरोपीने ‘तेरी गाडी सरका नही तो तेरेको खतम कर दूंगा.. ठहर याहापे मेरे गाडीमे रिव्हाल्वर है निकालता! असा दम भरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.










