spot_img
spot_img

💥सायबर क्राईम! आधी रूम भाड्याने घेऊन शेअर मार्केटचे सेंटर उघडले..मग पद्धतशीर भामट्याने पैसे उकळले! – गट विकास अधिकाऱ्याला दहा लाखाचा गंडा!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) भारतीय शेअर बाजार दीर्घकाळापासून गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे.त्यामुळे सर्वसामान्यांचा शेअर बाजाराकडे वाढलाय.आता जास्त लोक शेअर बाजारात पैसे गुंतवताहेत. लोकांचा शेअर बाजाराकडे वाढलेला कल पाहून त्याचा फायदा फसवणूक करणारे घेताहेत. निरक्षर तर सोडाच शिक्षितांची फसवणूक होत आहे.अशीच घटना बुलढाण्यात घडली.एका भामट्याने पैशांचे आमीष दाखवून येथील सोळंके लेआउट येथील एका गटविकास अधिकाऱ्याची दहा लाख रुपयांनी फसवणूक केली आहे.

त्याप्रकरणी 29 जानेवारीला सौ. उर्वशी रविंद्र सुरुशे यांनी सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. त्यांचे पती रविंद्र सुरुशे हे शेगांव पंचायत समितीला गटविकास अधिकारी म्हणुन नोकरी करतात.या सुरोशे दामत्यांनी 11 सप्टेंबर 2024 रोजी मोबाईलवर
फेसबुक हाताळत असतांना लक्ष्मी शेयर मार्केट ट्रेडींग क्लासेसची अॅड बघीतली.त्यावरील मोबाईल क्रमांक 8830217473 हा देण्यात आला होता.पती-पत्नींना शेयर मार्केट मध्ये रुची असल्याने सदर नंबर वर संपर्क साधला असता समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने बोलतांना त्याचे नांव रविकुमार देशमुख असे सांगीतले व तो एंजल वन कंपनीचा सब ब्रोकर असल्या बाबत सांगीतले शिवाय :मला बुलढाण्यात शेयर मार्केटचे क्लासेस सुरु करावयाचे आहे’ त्या करीता त्याने सुरोशे यांच्या घरात दोन खोल्या भाडेतत्वावर घेतल्या. दरम्यान पैशाच्या आम्ही दाखवून ‘माझ्या सल्ल्याने शेयर मार्केट मध्ये माझे वतीने इन्व्हेस्ट केल्यास तुमचे पैसे एका महिन्यात दुप्पट करुन दाखवतो’ असे म्हणाला. सुरोशे यांच्या घरामध्ये शेयरमार्केटचे क्लासेस सुध्दा सुरु केले.या क्लासमध्ये
विशालसींग प्रतापसींग पाटील, अमोल प्रकाशराव तिवाने , हरीदास संतोषराव भोपळे,सौ.मनिषा किशोर पाटील हे सुध्दा यायचे.

सदर आरोपी हा त्याचे फेसबुक आणि इंन्स्टाग्राम अकाउंटवर लक्ष्मी शेयर ट्रेडींग कंपनीची अॅड करुन तो त्यावर सुध्दा शेयर ट्रेडींगच्या टिप्स सांगायचा दरम्यान त्याचे मो. क्र.9561836638, 9552561462, 9579765758 हे सौ. सुरोशे यांना प्राप्त झाले होते.सदर इसमावर विश्वास ठेवुन त्याला 11 नंबर 2024 रोजी RTGS करुन 2,25,000 रुपये त्याच्या ICICI चे खाते क्र. 646801505173 मध्ये जमा केले. तसेच गटविकास अधिकारी यांच्या अकाउंट मधुन परत 4,75,000/- रुपये UPI व्दारे ऑनलाईन पध्दतीने दिनांक 20 सप्टेंबर व 22 ऑक्टोबर 2024 रोजी पाठवले व नंतर 3,00000 रुपये कॅश असे एकुण 10,00000 रुपये सुरोशी दांपत्यांनी सदर ईसमास शेयर मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करण्याचे नावाने दिले परंतू
काही दिवसांनी सदर इसम त्यांच्या घरातून महत्वाची मिटींग असल्याचे सांगुन निघुन गेला.हा सायबर क्राईम करणारा इतरांनाही फसवून गेल्याचे तक्रारीत म्हटले असून,सायबर पोलिसांनी याचा तपास त्वरित लावावा अशी मागणी करण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!