नांदूरा (हॅलो बुलडाणा) वाहतुकीचे नियम तुडविल्या जात असल्याने अनेक अपघात घडत असून बळींची संख्या वाढत आहे. 23 जानेवारी च्या मध्यरात्री देखील एका अपघातात दुचाकीस्वार तरुण ऋषिकेश शिवशंकर खराटे याला प्राण गमवावे लागले.त्याच्या दुचाकीला वडी क्रॉसिंग वर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
ऋषिकेश शिवशंकर खराटे हा युवक एम एच 28 सी ए 5704 क्रमांकाच्या दुचाकीने नांदुरा कडून माटोडा मार्गाने जात होता दरम्यान समोरून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकी सार करून ऋषिकेश खराटे जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.या घटनेबाबत एका नागरिकांनी नांदुरा येथील ओम साई फाउंडेशन ला माहिती दिली असता,ओम साई सेवकांनी घटनास्थळी पोहोचून संस्थेच्या रुग्णवाहिकेतून मृतकाला रुग्णालयात दाखल करण्याचे मदत कार्य केले.यावेळी ओम साई फाउंडेशन चे विलास निंबोळकर, कमलेश बोके, प्रकाश करुठले तसेच वडी येथील स्वयंसेवक यांनी पुढाकार घेतला.










