spot_img
spot_img

💥 BREAKING! ‘हद कर दी आपने?’ – सुरेखांनी केली बेकायदा ‘रेखा’ पार!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अनधिकृत घर बांधकाम करणे गुन्हा आहे.परंतु अनेक जण राजकीय बळावर किंवा इतर साम-दाम-दंड-भेद वापरून फुकट जमीन बळकावण्याच्या आणि बांधकाम करण्याच्या प्रयत्नात असतात. परंतु येथील विष्णू वाडीत अवैध बांधकाम करण्याचे प्रकरण घडले आहे.सुरेखा प्रकाश सूर्यवंशी यांनी ही अवैध सीमा ओलांडली असून याबाबत तक्रार दाखल झाली आहे.

प्रकरण असे आहे की,शुभम रमेश मेश्राम सहाय्यक नगर रचनाकार, नगरपरिषद कार्यालय यांनी सदर प्रकरणा बाबत शहर पोलिसांना फिर्याद दिली आहे.त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की,सुरेखा प्रकाश सूर्यवंशी यांचेवर
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 52 अन्वये अनधिकृत बांधकामाबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा! कारण त्यांना नगरपरिषदे अंतर्गत नोटीस 27 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आली होती.नगर परिषद हद्द, गजाजन महाराज मंदिर, चौक, विष्णूवाडी, बुलडाण सर्व्हे नं. 6 मधील प्लॉट नं. 70 या जागेवर सुरेखा प्रकाश सूर्यवंशी रा. गजाजन महाराज मंदिर चौक जवळ, विष्णूवाडी, बुलडाणा यांचे विनापरवानगी बांधकाम सुरु होते.त्यामुळे
अनधिकृत बांधकामाबाबत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 52 अन्वये फौजदारी कार्यवाही बाबत सुरेखा प्रकाश सूर्यवंशी यांना नोटीस बजावण्यात आली. परंतु अद्यापपर्यंत या कार्यालयाची रीतसर परवानगी न घेता सदर बांधकाम सुरूच असल्याचे निदर्शनास आले असून नपा अधिकारी यांनी रीतसर बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली व सुरेखा प्रकाश सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!