spot_img
spot_img

💥छडा! सराफाला लुटणाऱ्या 2 लुटेऱ्यांना बीडमधून उचलले! – एलसीबीची जिगरबाज कारवाई!

लोणार (हॅलो बुलडाणा) दर्शन ज्वेलर्सचे मालक आदित्य संचेती यांना अडवून त्यांच्या जवळील तब्बल 28,31,000 किंमतीचे सोन्या-चांदीचे दाग दागिने लुटणाऱ्या 2 संशयित गुन्हेगारांना एलसीबीने बेड्या ठोकल्या आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने व लोणार पोलिसांनी गुप्त माहितीवरून आरोपींना बीडमधून उचलले. आरोपींनी सोने चांदीचे दागिने बीड येथील सोनारस विक्री केल्याची कबुली दिल्याने मुद्देमाल हस्तगत करत समांतर तपास करण्यात येत आहे. आरोपी ऋषिकेश बबन बेदरे वय 28 वर्ष, रा. बेलोरा ता. जि. बीड,अशोक फुलचंद शिंगणे वय 32 वर्ष रा. नागपूर ता.जि. बीड यांना अटक करण्यात आली असून,श्रावण गणपत पवार रा. राजुरी बु. ता.जि. बीड हा फरार आहे.

▪️यांनी केली कार्यवाही …

पीएसआय प्रताप बजाड,शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, गजानन गोराले,दिपक वायाळ, विलास भोसले तसेच स्था.गु.शा. चे राजू आडवे,कैलास ठोंबरे, ऋषिकेश खंडेराव यांनी कारवाई केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!